सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मी अपघाताने पालकमंत्री झालो असलो तरी मी सिंधुदुर्गचा सुपुत्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाठी जे जे सहकार्य लागेल, ते निश्चितच करेन अशी ग्वाही राज्याचे बांधकामंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पारपोली येथे केले. यावेळी त्यांनी पारपोली गावासाठी ८० लाखाचा निधीदेखील जाहीर केला. श्री. चव्हाण आज पारपोली येथे आयोजित करण्यात आलेल्या फुलपाखरू महोत्सवानिमित्त ते व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी श्री. चव्हाण यांच्या हस्ते फुलपाखरू महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.
या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, अप्पर तहसीलदार मोनिका कांबळे, सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता महेंद्र केणी, बांधकाम उपअभियंता वैभव सगरे, आर्किटेक अमित कामत, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी, सहाय्यक उपवनसंरक्षक डाॅ. सुनील लाड, आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडगे, सावंतवाडी वनपरिक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, कुडाळ वनक्षेत्रपाल, तसेच परपोली ग्रामस्थ आदी उपस्थित होते.





