कलमठ सरपंचांचे नियोजनच ग्राम सक्षमीकरणाचे | केले चार नव्या संकल्पांचे नियोजन

कणकवली : केंद्र शासनाच्या दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार १० संकल्पांपैकी ४ संकल्पांवर प्रत्येक ग्रामपंचायतने उपक्रमांचे नियोजन करायचे आहे. त्यासाठी १५ वा वित्त आयोगमधून नियोजन करताना कलमठ ग्रामपंचायतने बालस्नेही गाव, महिला स्नेही गाव, स्वच्छ व हरित गाव आणि जलसमृद्ध गाव या चार संकल्पांची सरपंच संदीप मेस्त्री यांनी निवड केली आहे.

सदर संकल्पांचा शुभारंभ २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कलमठ ग्रामपंचायत कार्यालयासमोर करण्यात आला. त्यासाठी अनेक उपक्रम नियोजित असून बालस्नेही, महिला स्नेही या संकल्पांमधून कलमठ गावातिल विद्यार्थी व महिलांसाठी शैक्षणिक, आरोग्य, कृषि, महिला सबलीकरण यावर अनेक अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी योग्य नियोजन आपण केले असून ते यशस्वी होतील असे सरपंच संदिप मेस्त्री यांनी सांगितले. २६ जानेवारी रोजी कलमठ ग्रामपंचायतसमोर फलकवर प्रसारित करून या संकल्पांचा शुभारंभ झाला.

यावेळी कलमठ सरपंच संदिप मेस्त्री, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, सदस्य दिनेश गोठणकर, स्वाति नारकर, श्रेयस चिंदरकर, इफत शेख, पपू यादव, नितिन पवार, सुप्रिया मेस्त्री, अनुप वारंग, हेलन कांबळे, सचिन खोचरे, मुख्याध्यापक, आरोग्य अधिकारी, अंगणवाड़ी सेविका, कृषि अधिकारी, महिला ग्रामसंघ व इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.