सांगली – पेठनाका रस्त्याचे गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन…!

सांगली : महामार्गामुळे देशाच्या विकासाला चालना मिळाली आहे. मात्र भविष्यात इलेक्ट्रिक व जैवइंधनावर चालणारी वाहने ही काळाची गरज आहे, असे मत महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. सांगली जिल्ह्यात आष्टा येथे सांगली ते पेठ नाका या मार्गाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

एन एच 166 या 41. 250 किलोमीटर लांबीच्या व 866. 45 कोटी रुपये किमतीच्या रस्त्याच्या चौपदरीकरण काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आणि कोनशीला अनावरण नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याचे कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे, आमदार जयंत पाटील खासदार धैर्यशील माने, खासदार संजय पाटील, आमदार अरुण लाड, डॉ विश्वजीत कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.

सांगलीला महामार्गाची जोडण्यात यावे अशी अनेक वर्षांची मागणी होती असे सांगून महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, या महामार्गाच्या कामाला उशीर झाला हे खरे असलेतरी एक महिन्याच्या आत या कामाला सुरुवात होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.