७५ व्या गांधी पुण्यतिथीनिमित्त, प्रा. मधु दंडवते जन्मशताब्दी वर्षानिमित्त खास आयोजन…
दिगग्ज मान्यवरांची होणार व्याख्याने..!
मालवण : मालवण बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे महात्मा गांधींच्या ७५ व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच प्रा. मधू दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘गांधी जागर’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
आज या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे, लेखक निरंजन टकले, पत्रकार हेमंत देसाई, कवी अजय कांडर, सेवांगणचे देवदत्त परुळेकर, नवनाथ तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

या ‘गांधी जागर’ मध्ये होणारे कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत :
२८ जानेवारी २०२३ :
१०.३० ते १२ गांधी का मरत नाही ? चंद्रकांत वानखडे १२ ते १२.३० प्रश्नोत्तरे
२ ते ५ ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या अजय कांडर यांच्या दीर्घ कवितेवर परिसंवाद, अध्यक्ष : हेमंत देसाई वक्ते : नवनाथ तुपे, मुकुंद कुळे, संपत देसाई, सुशील धसकटे, अजय कांडर
६ ते ८ गांधीजींच्या वाटेवरचा प्रवास, निरंजन टकले
८ ते ८.३० चर्चा
२९ जानेवारी २०२३ :
१०.०० ते ११.३० गांधीजी आणि संविधान, प्रमोद चुंचूवार
११.३० ते १२ प्रश्नोत्तरं
१२ ते १ गांधी गारूड, संजीवनी खेर
२ ते ३ दक्षिण कोकणात गांधी, डॉ. राजेंद्र मुंबरकर
३ ते ४.३० : गांधी आणि समाजवाद, सुभाष वारे
४.३० ते ५ : समारोप





