देवगड : देवगड तालक्यातील टेंबवली कालवीवाडीचे सुपुत्र व मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले संतोष सखाराम कोंयडे यांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ७४ पोलीस पदक विजेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे.
१९८८ मध्ये पोलीस दलात दाखल झालेल्या कोयंडे यांनी आजवर २१३ विविध पदके मिळवली आहेत. यात २०२० मध्ये पोलीस महासंचालकांचे उल्लेखनीय सेवा व अभिलेख चांगला ठेवल्याबद्दलच्या विशेष सन्मान चिन्हाचाही समावेश आहे. आपल्या ३४ वर्षाच्या सेवा काळात त्यांनी गुन्हे शाखा पोलीस ठाण्यात उल्लेखनीय सेवा बजावली आहे. सध्या ते वडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तेव्हा सुद्धा ते तपास करण्यासाठी दुसऱ्या राज्यात आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील ९०१ पोलिसांनी पोलिसांना विविध राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलीस दलात कार्य केलेले शौर्य उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील ७४ पोलिसांना गौरवण्यात आले. यामध्ये उल्लेखनीय सेवा ४ शौर्य ३१ तर पोलीस दलामध्ये गुणवत्ता पूर्ण सेवा बजावल्याप्रकरणी राज्यातील ३९ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहे. संतोष यांचे वडील सखाराम गणवत कोयंडे हे सुद्धा पोलीस दलातील निवृत्त कर्मचारी आहेत. त्यामुळे संतोष कोंयडे यांच्या यशाने त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





