अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होणार …?

दिल्ली : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. पंजाबच्या काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसपासून फारकत घेतली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना महाराष्ट्राचे राज्यपाल बनवण्याची घोषणा त्यांच्यासाठी भाजप प्रवेशाची मोठी भेट ठरत आहे. वस्तुतः महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर पदावरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर अमरिंदर सिंग यांना राज्यपाल बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.