एक विशाल तारा लुप्त झाला..! – सहकारसूर्य पी. एफ. डॉन्टस यांना सुनील राऊळ यांची शब्दांजली..

97

अनेक व्यक्तीचं कमी कालावधीत सुध्दा कर्तृत्व येवढे विशाल असत की त्याची उंची क्षितिजा पलिकडे जाऊन पोहोचते !! असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे पी. एफ. डॉन्टस साहेब. सैन्य सेवेतून 1980 निवृत्त होऊन राज्य सरकारी सेवेत दाखल होते.. प्रचंड नेतृत्व गुणामुळे जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्याच्याकडे येते…आणि सिंधुदुर्ग जिल्हा मधे सरकारी कर्मचाऱ्यांचा आवाज बुलंद होतो…! संघटनेची प्रचंड आंदोलने उभी राहतात… जिल्हाधिकारी यांना सुध्दा हा बुलंद आवाज त्यावेळी नडला होता.. नेत्वृव होत पी. एफ. डॉन्टस. एवढ्यावर न थांबता कर्मचाऱ्यांची आर्थिक गरजा भागवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची पतसंस्था निर्माण करणे हे कामही ह्या नेतृत्वाने केलं. आज हिसंथा दिमाखात ओरोस येथे स्वावस्तुत अभी आहे.

नंतर स्वेच्छा निवृत्ती 1991 मध्ये घेऊन सैनिकांसाठी सैनिक पतसंस्था..!

ख्रिश्चन समाजासाठी .. कॅथोलिक अर्बन पतसंस्था.. निर्माण केल्या. आज या संस्था जिल्ह्यात डौलाने उभ्या आहेत.. शिस्थ प्रिय विद्यार्थी घडवण्यासाठी. सैनिक स्कूल आंबोली.. तेही डौलाने उभे आहे!! माजी सैनिकांसाठी महाराष्ट्र भर कार्य करत राहिले. महाराष्ट्र माजी सैनिक संघटनेचे सलग रेकॉर्ड ब्रेक 15 वर्ष अध्यक्ष पद भूषविले. भारत संघटनेचे उपाध्यक्ष सलग 10 वर्ष भूषविले .. एवढे अजोड कार्य .. सिंधुदुर्गच्या इतिहासात कायम नोंद राहणार यात शंका नाही..त्यांच्या या कार्याने अनेकांना रोजगार उपलब्ध झाले ..

त्यांनी जनसमुदाय जोडला या कार्याने.. असं हे विशाल कार्याचा तारा आज आमच्यातुन लुप्त झाला.. त्यांची उणीव आम्हांस नेहमीच जाणवणार आहे… पण त्यांच्या या कार्यास सलाम .. त्यांना चिरशांती मिळो ही प्रार्थना..!

✍️सुनील राऊळ,

सीईओ सैनिक पतसंस्था