ईशान 0, रोहित 0, श्रेयस 0, ऑस्ट्रेलियाचा पहिल्या दोन ओव्हरमध्ये ‘सर्जिकल स्ट्राईक’!

40

चेन्नई : वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात पहिल्या सलामीच्या लढतीत टीम इंडियाने दमदार सुरुवात करताना अवघ्या 200 धावांत गुंडाळले. फलंदाजीमध्ये मात्र दाणादाण उडाली आहे. पहिल्या पहिल्या तीन षटकांमध्येच तीन बाद पाच अशी भारताची अवस्था झाली. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा, ईशान किशन आणि त्यानंतर आलेल्या श्रेयस सुद्धा अगदी खातं न उघडताच तांबूत परतल्याने भारताची अवस्था तीन बाद पाच अशी झाली.

तत्पूर्वी, भारताच्या जडेजा आर. आश्विन आणि कुलदीप या त्रिकूटाने केलेल्या दमदार कामगिरीचा जोरावर ऑस्ट्रेलियाला अवघ्या 199 धावांत गुंडाळले. 200 मापक आव्हान घेऊन उतरलेल्या भारताची सुरवात अत्यंत निराशाजनक झाली. त्यामुळे पुन्हा एकदा 2019 वर्ल्डकपच्या पहिल्या लढतीची आठवण झाली आहे. त्यावेळी सुद्धा न्यूझीलंडविरोधात भारताला तीन बाद पाच असा सामना करावा लागला होता. त्यावेळी भारताने हा सामना गमावला होता. त्यामुळे आजच्या लढतीत आता मैदानात विराट कोहली, लोकेशन राहुल असून ते कशी लढत देतात यावर सामन्याचं चित्र अवलंबून असेल.