राजन नाईक यांना पितृशोक

39

 

 

राजन नाईक यांना पितृशोक

सावंतवाडी – मळेवाड हेदुलवाडी येथील वसंत गंगाराम नाईक (वय 81) यांचे दुःखद निधन झाले आहे. नाईक हे गेली 40 ते 45 वर्ष मळेवाड येथे किराणामाल दुकानाचा व्यवसाय करत होते. नाईक हे जयानंद मठकर यांचे कार्यकर्ते म्हणून कित्येक वर्ष जनता दल या पक्षाचे सक्रियपणे काम केले होते. पत्रकार तथा माजी उपसरपंच राजन नाईक यांचे ते वडील होय. नाईक यांच्या पक्षात चार मुलगे,सुना नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.त्यांच्या जाण्याने गावात शोक व्यक्त करण्यात येत आहे.