ना.अजित दादा पवार यांच्या नावाची उपमुख्यमंत्री पदी घोषणा होताच राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी केले अभिनंदन!

17

 

कणकवली दि.४डिसेंबर ( प्रतिनिधी)

ना.अजित दादा पवार यांच्या नावाची उपमुख्यमंत्री पदी घोषणा होताच राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी केले अभिनंदन!

राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांची महायुती सरकार मध्ये उपमुख्यमंत्री पदाची घोषणा होताच मुंबई येथील देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी भेट घेवून उपमुख्यमंत्री पदी नाव जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केले.

यावेळी कार्याध्यक्ष काका कुडाळकर , प्रांतिक सदस्य डॉ.अभिनंदन मालंडकर , सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष हार्दिक शिंगले, माजी तालुकाध्यक्ष मकरंद परब,सावंतवाडी तालुकाध्यक्ष हर्षद बेग, सुनील हरमलकर, व्हिक्टर फर्नांडिस, अरुण मलांनकर आदी उपस्थीत होते.यावेळी शुभेच्छा देताना प्रफुल्ल सुद्रीक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आता आणखी गतीने होईल असा विश्वास व्यक्त केला.