संगीत स्पर्धा परीक्षक सतीश शेजवलकर यांचे निधन

7

संगीत स्पर्धा परीक्षक सतीश शेजवलकर यांचे निधन

कुडाळ – प्रतिनिधी ९ जुलै २०२४

कुडाळ शिवाजीनगर येथील उत्कृष्ट संवादिनी वादक, महाराष्ट्र ब्राह्मण मंडळ कुडाळ तालुका सांस्कृतिक समिती सदस्य, संगीत स्पर्धा परीक्षक सतीश शेजवलकर (वय 67) यांचे आज मंगळवारी दुपारी बारा वाजता कुडाळ येथे निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. अंत्यसंस्कार कुडाळ नगरपंचायत स्मशानभूमी येथे साधारण सायंकाळी 5.00 दरम्यान होतील.कुडाळ शहरात शोक व्यक्त केला जात आहे