आरवली टांक सागरतीर्थ समुद्रकिनारी धूप होऊन घरांना धोका;  भाजपा नेते राजन तेली  यांची केली पाहणी

7

वेंगुर्ला – प्रतिनिधी ९ जुलै २०२४

 

आरवली टांक सागरतीर्थ समुद्रकिनारी धूप होऊन घरांना धोका;  भाजपा नेते राजन तेली  यांची केली पाहणी

 

पावसाळयामुळे आरवली टांक सागरतीर्थ समुद्रकिनार पट्टीवर समुद्राला उधाण आल्यामुळे तेथील वाळूची धूप होऊन समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आहे त्यामुळे तेथील स्थानिक घरांना धोका निर्माण झाला आहे समुद्राला लागूनच असलेल्या लोकवस्तीत सर्व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

त्यामुळे तेथील भाजप स्थानिक नेते देवेंद्र उर्फ बाळू वस्त यांनी आक्रमक होऊन भाजप वरिष्ठ नेते वसंत तांडेल यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्या मार्फत सहा.पत्तन व अभियंता पत्तन उपविभाग वेंगुर्ला चे अधिकारी यांनी दोन दिवसापूर्वी येऊन पाहाणी केली होती . हा विषय गांभीर्याने घेऊन भाजप,सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली साहेब यांनी भेट देऊन तेथील स्थानिक भाजप नेते देवेंद्र उर्फ बाळू वस्त,स्थानिक ग्रामस्थ सचिन मंत्री,कविता मंत्री,आकाश वेलंणकर, प्रकाश गावकर,मधुकर मंत्री,सूर्यकांत गांवकर,उदय मंत्री,विजय मंत्री यांच्याशी संवाद साधून तेथील पाहाणी केली त्यांना समुद्राचेरूद्र रुप पाहून गंभीर परिस्थितीची जाणीव झाली या पुढे घरांना धोका होऊन नये म्हणून जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे साहेब सोबत सकारात्मक फोन द्वारे चर्चा केली यावर आपत्ती व्यवस्थापन मधून तात्पुरती व्यवस्था करुन देतो अशी त्यांनी ग्वाही दिली.

स्थानिक ग्रामस्थांनच्या मागणी नुसार कायम स्वरूपी धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनमधून प्रस्ताव पाठवण्याची विनंती सुध्दा त्यांना करण्यात आली यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले.यावेळी त्यांच्या सोबत माजी शिरोडा सरपंच मनोज उगवेकर,भाजप वेंगुर्ला मंडल उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,रेडी जि.प. विभाग प्रमुख अमित गावडे,शिरोडा भाजप उपाध्यक्ष संतोष अणसूरकर,भाजप शिरोडा ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रशेखर गोडकर,अनिल गावडे,आरवली शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक,सागरतीर्थ भाजप पदाधिकारी देवेंद्र उर्फ बाळू वस्त,मळेवाड ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत मराठे,व ग्रामस्थ उपस्थित होते.