देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोशियनच्यावतीने जागतिक फार्मसिस्ट दिनाचे औचित्य साधुन देवगड तालुक्यातील असलदे या ठिकाणी दिविजा वृद्धाश्रमातील वृध्दांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आश्रमात औषधे, डायपर, तांदूळ, गहू, डाळ, कपडे इत्यादी वस्तू सुपुर्द करण्यात आल्या. यावेळी सिंधुदुर्ग केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन जिल्हाध्यक्ष आनंद रासम, सचिव संजय सावंत, दयानंद उबाळे, विजय लोके, दिनेश वळंजूआदी उपस्थित होते. या वेळी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. तापसे यांनी आरोग्य तपासणीसाठी मोलाची मदत केली.








