सिंधुदुर्ग : जिल्हयाचे प्रवेशव्दार असलेल्या करूळ घाटात २ ऑक्टोंबरला स्वच्छता मोहीम राबविण्याचा महत्वपुर्ण उपक्रम ग्रामपंचायत करूळ, तालुका पत्रकार समिती आणि सह्याद्री जीवरक्षक संस्थेने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहीमेत सर्व स्वच्छताप्रेमीनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
करूळ घाट हे सिंधुदुर्ग जिल्हयाचे प्रवेशव्दार आहे. या घाटाला ऐतिहासीक महत्व देखील असुन पर्यटनाच्या दृष्टीने या घाटाला अन्यन्यसाधारण महत्व आहे. हजारो पर्यटक या घाटरस्त्याने प्रवास करीत असतात.








