वेळागर येथील प्रकल्पाला विरोध नको : माजी आमदार शंकर कांबळी.

37

वेंगुर्ले : शिरोडा – वेळागर येथील २६ वर्षे रखडलेला प्रकल्प राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अथक प्रयत्नाने मार्गी लागून जमीन मालकांना न्याय मिळत असेल तर कोणीही इतर जमीन मालकांनी विरोध न करता सर्वानीच प्रकल्पास साथ देऊन प्रकल्पामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या फायद्यांचा लाभ घ्यावा. असे आवाहन जमिन मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे नेतृत्व माजी आमदार शंकर कांबळी यांनी शिरोडा-वेळागर भूमीपुत्र संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत केले.