सावंतवाडी : येथील मोती तलावात काल रात्री अनोळखी युवकाने उडी घेतल्याची घटना घडली होती.
दरम्यान यावेळी नगरपालिका प्रशासन व पोलिसांनी त्याचा शोध घेतला होता. मात्र तो न सापडल्याने रात्री उशिरा शोध मोहीम थांबवण्यात आली होती.
दरम्यान आज सकाळी काही नागरिकांना एक मृतदेह मोती तलावात तरंगताना आढळून आला असता माजी नगरसेवक राजू मसूरकर यांनी पोलिसांना व नगरपालिका प्रशासनाला याबाबत माहिती दिली. तात्काळ यंत्रणा पाचारण करत सदरचा मृत्यूदेह बाहेर काढण्यात आलाय.
युवकाचा मृतदेह आता बाहेर काढल्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये शव विच्छेदन करून ओळख पटल्यावर नातेवाईकांच्या शोध घेण्यात येणार आहे.





