जालना : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत. राज्यातील१३ जिल्हात होणाऱ्या या दौऱ्याची सुरूवात जालन्यातील अंतरवली सराटी गावातून केला जाणार आहेत. या दौऱ्याचा पहिला थांबा हा परभणीच्या जिंतूर येथे होणार आहे.
मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यासोबतच संपूर्ण मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. यानंतर मराठवाड्याबाहेर सोलापूर, नगर, नाशिक, यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यात देखील मनोज जरांगे दौरा करणार आहेत.
मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिलेला ४० दिवसांच्या वेळेमधील ३० दिवस १४ ऑक्टोबर रोजी संपणार आहेत. यापूर्वी जरांगे यांनी जाहिर केल्याप्रमाणे मनोज जरांगे १४ तारखेला मराठा समाजाची जाहीर सभा घेणार आहेत. मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व मराठा समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांचा हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे.








