दुर्घटना – पंक्चर काढताना जॅक तुटला.! ; एसटी चालक गंभीर जखमी.

315

देवगड : देवगड आगाराची कणकवली – मिठबाव – तांबळडेग ही गाडी तांबळडेग येथून कणकवली येथे जात होती. ही गाडी मिठबाव बाजारपेठेत आलेली असताना पंक्चर झाली. मात्र पंक्चर काढत असताना जॅक निसटल्याने पंक्चर काढणाऱ्या ड्रायव्हरच्या अंगावर ही गाडी आपटली. यामुळे ड्रायव्हरच्या मणक्याला जोरदार मार लागला असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने देवगड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

काल मिठबावचा बाजार असल्याने तसेच मुंबईचे प्रवासी आत असल्याने गाडी पूर्ण भरलेली होती. पंक्चर काढत असताना गाडीतील प्रवासी उतरलेले नव्हते. गाडीचा जॅक लावत असतानाच तो तुटला किंवा सुटला असावा, यामध्ये गाडीचा चालक जखमी झाला आहे.