‘होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न !’ ; ६ ऑक्टोबरपासून कणकवली मतदार संघात अभियान.

36

कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाच्या वतीने शुक्रवार 6 ऑक्टोबर 2023 रोजी  ‘होऊ दे चर्चा, विचारा प्रश्न.!;  हे अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त वैभववाडी, देवगड आणि कणकवली तालुक्यात कॉर्नर सभा घेण्यात येणार आहेत. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता वैभववाडी येथे छ. संभाजी राजे चौक, सायं. 4 वाजता देवगड, आणि सायं. 6 वा. कणकवली आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे या कॉर्नर सभा होणार आहेत.