ट्रक – बसचा भीषण अपघात.! ; मथुरेला जाणाऱ्या ११ भाविकांचा मृत्यू .!

57

नवी दिल्ली : राजस्थानमधील भरतपूरमध्ये भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. NH 21 वर असलेल्या लखनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील हंत्रा पुलावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

भाविकांना घेऊन ही बस गुजरातहून उत्तर प्रदेशातील मथुरा येथे जात होती. या बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते, त्यापैकी 11 जणांना आपला जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली बस भावनगरहून मथुरा येथे जाण्यासाठी निघाली होती. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सहा महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत आणि जखमी भावनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अज्ञात वाहनाने पार्क केलेल्या बसला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच लखनपूर, नादबाई, हलैना, वैर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.