मोठी बातमी – अयोध्येतील राम मंदिराखाली आढळले पुरातन अवशेष ! ; कित्येक मूर्ती आणि स्तंभांचा समावेश!

207

अयोध्या :  अयोध्येतील श्रीराम मंदिराखाली अनेक पुरातन मूर्ती आणि स्तंभ मिळाल्याचं समोर आलं आहे. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक्स (ट्विटर) पोस्ट करत याबाबत माहिती दिली. मंदिरासाठी खोदकाम सुरू असताना या मूर्ती आढळल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.