मालवण : पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या माध्यमातून झालेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, जलपर्यटन क्षेत्रात प्रशासन व व्यावसायिक यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील जलपर्यटन वाढीस मदत होईल, असा विश्वास पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी व्यक्त केला.
कोकण किनारपट्टीवर स्थानिक नागरिक जलपर्यटनाच्या व्यवसायाशी जोडले जाऊन देश- विदेशातील पर्यटकांना चांगली सेवा देत असल्याने राज्याच्या जलपर्यटन विकासात वाढ होत आहे, असेही त्यांनी सांगितले.





