कणकवली : पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करणेबाबतचा स्टेटस ठेवून पाकिस्तानचा उदो उदो करणाऱ्या, तसेच हिंदू देव देवतांचा अपमान होईल, असा स्टेटस ठेवणाऱ्या ‘त्या’ प्रवृत्तीचा कणकवली तालुका मुस्लिम समाजाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
कणकवली व जिल्ह्यात स्थानिक मुस्लिम व इतर धर्मियांबाबत कधीही आपसात मतभेद नाहीत, असे असताना बाहेरील लोक असे कृत्य करत असतील तर कारवाई करा, अशी मागणी मुस्लिम समाजाने केली आहे. सदर व्यक्ति ही कणकवली तालुक्यातील नसून बाहेरील राज्यातून आलेली आहे.





