युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांनी घेतले श्री देव कुणकेश्वरचे दर्शन.!

43

देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी श्री देव कुणकेश्वर चरणी अभिषेक करून श्री देव कुणकेश्वराची विधिवत पूजा केली.

यावेळी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांच्याहस्ते युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, व्यवस्थापक रामदास तेजम आदी उपस्थित होते.