रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदाची रोनापाल छात्रालयास भेट.! ; जीवनावश्यक वस्तू, खाऊचे केले वाटप.

38

बांदा : येथील रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांनी रोटरी वर्ष २०२३-२४ साठी सुरू केलेल्या प्रोजेक्ट आशय अंतर्गत आज रोनापाल छात्रालयास भेट दिली. यावेळी जीवनावश्यक वस्तू व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. मुलांना भेटवस्तू म्हणून शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी रोटरॅक्ट क्लब चे अध्यक्ष अक्षय मयेकर, सेक्रेटरी अवधूत चिंदरकर, मिताली सावंत, रोहन कुबडे, दत्तराज चिंदरकर, विनिता कुबडे, शिवम गावडे व रोटरी क्लब ऑफ़ बांदा चे सचिव बाबा काणेकर, पत्रकार मंगल कामत उपस्थित होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी प्रोजेक्ट आशय हा रोटरॅक्ट तर्फे गरजु व्यक्तींना मदत करण्यासाठी सुरू केलेला असून या अंतर्गत वर्षभर प्रत्येक महिन्यात सिंधुदुर्गातील विविध आश्रमाला भेट देऊन मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी छात्रालयाचे व्यवस्थापक जिवबा वीर यांनी आभार मानले.