Home क्रीडा BRAVO…कलंबिस्त हायस्कूलच्या ३ विद्यार्थ्यांची बॉक्सिंगच्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड..!

BRAVO…कलंबिस्त हायस्कूलच्या ३ विद्यार्थ्यांची बॉक्सिंगच्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड..!

124
  • सावंतवाडी : ओरोस येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग क्रीडाप्रकारात कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करीत विभागीय स्पर्धेकरीता पात्र ठरले आहेत. यामध्ये विठ्ठल राजेश राऊळ 45 किलोपेक्षा अधिक वजनी गटात प्रथम क्रमांक, राहुल प्रदीप वारंग 40 किलो पेक्षा अधिक वजनी गटात प्रथम क्रमांक, तर विघ्नेश सत्यविजय राऊळ याने 28 किलो पेक्षा अधिक वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त करुन हे यश संपादन केले आहे.
  • या  सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रकाश पावरा यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.