मालवण : चौके प्राथमिक आरोग्य केंद्रांत ड्यूटीवर असलेले परिचर संतोष चव्हाण साफसफाई करत असताना आरोग्य केंद्रातील कॉरिडॉरमध्ये त्यांना साप दिसला. त्यांनी बाजूच्या इमारतीत असलेल्या डॉ. प्रणव पोळ व इतर कर्मचारी यांना याबाबत कल्पना दिली. इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा या प्रजातीचा हा साप असल्याचे समजताच वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव पोळ यांनी तात्काळ मालवण – वायरी येथील सर्पमित्र अनंत बांबर्डेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तातडीने चौके आरोग्य केंद्रांत येत कोब्राला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.





