‘मातोश्री’चा विश्वासू नितीन देसाईंना देत होता धमक्या..! – आम. नितेश राणे यांचा खळबळजनक आरोप.

51

मुंबई : दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना मातोश्रीच्या निकटवर्तीयांनी धमकी दिल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला. ठाकरे नामक सिनेमाचे शूटिंग देसाईंच्या एनडी स्टुडिओत झाले होते. त्याचे त्यांना पैसे देण्यात आले का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. नितीन देसाई यांनी नुकतीच आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.