…तर देवगड शहरात फिरणे मुश्किल होईल – नगरसेवक निवृत्ती (बुवा) तारी..!

225

देवगड : देवगड जामसंडे मधील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी नगरपंचायत सत्ताधारी म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत. नगराध्यक्ष व शिवसेना नगरसेवक यांनी दहीबाव अन्नपूर्णा नदीतील गाळ काढला. मात्र हा गाळ काढण्यासाठी ज्याच्याकडून भाडेतत्त्वावर सामग्री वापरली त्याच आनंदवाडी बंदर प्रकल्पाच्या ठेकेदारांना माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर व त्याच्या सहकाऱ्यांनी धमकावून प्रकल्पाचे काम बंद पडले आहे. नगरपंचायत मधील सत्ता गेल्यामुळे हतबल झालेल्या चांदोस्कर व त्यांच्या कंपूनी येनतेन प्रकारे सत्ताधाऱ्यांना कसे जनतेच्या मनात बदनाम करता येईल यासाठी मंजूर केलेली विकास कामे सत्तेच्या बळावर रद्द करणे, भाजपच्या कार्यकर्ता ठेकेदार असल्याने त्याला हाताशी धरून नळयोजनेचे काम पाणी अनिमित करण्याचे प्रकार करणे असे प्रकार करून जनतेचे हाल करणे. त्यांना वेठीस धरण्याचे चांदोस्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी थांबवावे अन्यथा देवगड शहरात फिरणे मुश्किल होईल असा इशारा शिवसेना नगरसेवक बुवा तारी यांनी दिला आहे.

देवगड येथील उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नगरसेवक बुवा तारी यांनी माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर व त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

सत्यागेल्यापासून ती परत मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांबद्दल बदनामी करण्याचा एकमेव अजेंडा त्यांनी राबविला आहे. देवगड जामसंडेमध्ये सध्या पाणी प्रश्न गंभीर आहे . मात्र नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सत्ताधारी नगराध्यक्षा व शिवसेना नगरसेवक प्रयत्न करीत आहे. पाण्याची पातळी कमालीची घटली आहे अशा स्थितीत नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र याउलट जनतेचे कसे हाल होतील व त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कसे बदनाम करता येईल यासाठी वाटेल ते करायचे हा एकमेव उद्योग सध्या चांदोस्कर व त्यांची टीम करत आहे. अन्नपूर्णांनदीतील गाळ काढण्यासाठी नगराध्यक्षांनी मानधन दिले ते शिवसेना नगरसेवकांनी स्वखर्चाने गाळ काढला यासाठी आनंदवाडी बंदर प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून पोकलेन डंपर अशी सामग्री भाडे तत्त्वावर घेतली. मात्र माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठेकेदाराला धमकावले. बुवा तारी कोण? त्यांना डंपर व पोकलेन कसे दिले ? देताना तू आमदारांना विचारलेस का ? आमदारांना विचारलेस शिवाय गाळ कसा काढला ? प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करण्याची धमकी दिली. त्यामुळे या प्रकल्पाचे काम केले आठ दिवस बंद आहे. देवगडचे अर्थकारण बदलून टाकणारा मच्छीमारांना आवश्यक असणारा आनंदवाडी प्रकल्प मत्स्योद्योग महामंडळाचे तत्कालीन उपाध्यक्ष कुलदीप पेडणेकर यांनी मंजूर करून आणला. त्यानंतर बंद स्थितीत असलेला हा प्रकल्प खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून सुरू झाला. मात्र श्रेयवादासाठी व हेकेखोरपणासाठी विकास कामे बंद करून देवगडचे नुकसान करण्याचे काम माजी नगराध्यक्ष व त्यांचे सहकारी करत आहेत. सत्ताधाऱ्यांची २ कोटी ७५ लाखाची मंजुर विकास कामे सत्तेच्या बळावर रद्द केली. यामध्ये मळई रस्ता, आनंदवाडी रस्ता, मळई स्मशानभूमी, जामसंडे स्मशानभूमी, या विकास कामांचा समावेश होता. सध्या नळयोजना देखभाल दुरुस्तीचे काम करणारा ठेकेदार अनिल कोरगावकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्याला हाताशी धरून पाणीपुरवठा अनियमित करणे शिरगाव पाडाघर योजनेवरून पाणीपुरवठा कशाप्रकारे कमी होईल. पाणी जनतेला कसे मिळणार नाही असे प्रकार करून केवळ सत्याधारांना जनतेच्या मनात बदनाम करण्याची प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये जनतेचे हाल होत आहेत सत्ता गेल्याने प्रचंड दुःख झाले आहे. त्यामुळे सुडापोटी सत्ताधाऱ्यांचा प्रत्येक कामात अडथळे आणायचे त्यांना बदनाम करण्याचे प्रकार चांदोस्कर करीत आहेत. सध्या निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत . वास्तविक विरोधकांनी त्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र यात अडथळा निर्माण करून ते बंद कसे पाडायचे व जनतेला कसा त्रास द्यायचा हेच काम चांदोस्कर करीत आहेत. मात्र जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार खपपून घेतले जाणार नाही. हे प्रकर न थांबल्यास देवगड मध्ये फिरू देणार नाही असा इशारा नगरसेवक बुवा तारी यांनी माजी नगराध्यक्ष व त्याच्या सहकाऱ्यांना दिला आहे .

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे, गणेश गावकर उपस्थित होते.