दिनविशेष …….राष्ट्रीय सागरी दिन.!

90

दिनविशेष : ५ एप्रिल २०२३ हा दिवस भारतात राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतातील सर्वात जुनी शिपिंग कंपनी, द सिंडिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडच्या पहिल्या जहाजाच्या युनायटेड किंगडमला प्रवासाचे स्मरण स्मरण करतो. पर्यावरणदृष्ट्य सकारात्मक पद्धतीचा प्रतिसाद देणारा दृष्टिकोन दर्शविण्याकरिता भारतात दरवर्षी ५ एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येतो. ५ एप्रिल १९६४ रोजी हा दिवस प्रथमच साजरा करण्यात आला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या भरभराटीत सागरी उद्योग बजावत असलेल्या महत्त्वाच्या भूमिकेच्या उत्सवासाठी समर्पित आहे. या व्यतिरिक्त, या दिवशी, असंख्य खेळाडू आणि सागरी क्षेत्रातील सहभागींना त्यांचे प्रयत्न आणि योगदान ओळखण्यासाठी पुरस्कार देऊन त्यांचे कौतुक केले जाते. भारतीय सागरी क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीचा सर्वोच्च सन्मान मानला जाणारा वरुण पुरस्काराने लोकांना ‘सन्मानित केले जाते. १९१९ साली जेव्हा भारत ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होता. तेव्हा ५ एप्रिल रोजी एस. एस. लॉयल्टी नावाचे जहाज मुंबईहून लंडनला निघाले होते. हे जहाज सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडच्या मालकीचे होते, ही सर्वांत मोठी शिपिंग कंपनी आहे, जी पूर्णपणे भारतीयांच्या मालकीची आहे. भारतीय उपमहाद्वीप आणि तेथील जलमार्ग अजूनही ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली असल्यामुळे हा एक महत्त्वाचा दिवस होता. इंग्लंड, फ्रान्स आणि पोर्तुगाल यांसारख्या युरोपीय व्यापारातील दिग्गजांना उर्वरित आशियाशी जोडल्यामुळे, जागतिक व्यापाराच्या अनुषंगाने भारत ही त्यावेळी महत्त्वाची भूमी होती.

अधिक माहिती👇

दरवर्षी ५ एप्रिल रोजी भारतात राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. अनेक महिने समुद्रात घालवणाऱ्या माणसांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावर वाढविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. १९६४ पासून भारतात ५ एप्रिल रोजी राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. याच तारखेला इ. स. १९१९ मध्ये एस. एस. लॉयल्टी, हे पहिले भारतीय व्यापारी जहाज भारतीय ध्वज लावून मुंबईहून लंडनला निघाले होते. सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेड ही कंपनी एस. एस. लॉयल्टीची मालक होती. मात्र, या सिंदिया शिपचे अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न ब्रिटिश शिपिंग कंपन्यांनी त्यांच्या सरकारच्या माध्यमातून केला होता. आणि तेथेच अस्तित्वाचा लढा सुरू झाला. हा इतिहास असला तरी देशाला लाभलेला समुद्र किनारा आणि या माध्यमातून होणारी आयात-निर्यात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी आहे. या राष्ट्रीय नौकानयनाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचले नसले तरी हा दिवस देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जलमार्ग मंत्रालय या वर्षी ६० वा राष्ट्रीय सागरी दिन साजरा करते आहे. व्यापाराला नवसंजीवनी देणारा दिवस म्हणून हा दिवस प्रसिद्ध ठरला आहे. या राष्ट्रीय नौकानयन दिनाचा इतिहास जाणून घ्यायला हवा. दळवळणासाठी केवळ रस्ते, हवाई मार्ग एवढेच पुरेसे नाही. व्यापार हे देशाचे जीवनदायी रक्तच आहे. त्यानुसार काळाच्या ओघात त्याची व्याप्ती होणेही तेवढेच गरजेचे आहे. याच दळणवळणाच्या दृष्टिकोनातून ५ एप्रिल या दिवसाला एक वेगळेच महत्त्व आहे. १०४ वर्षापूर्वी याचदिवशी भारतीय मालकीच्या सिंदिया शिपिंग कंपनीची बोट मुंबईहून इंग्लंडला निघाली होती. तेव्हापासून आधुनिक भारतामधले मर्चंट नेव्ही सुरू झाले होते. (छत्रपती. शिवाजीमहाराज हे मध्ययुगीन भारताच्या मर्चंट नेव्हीचे जनक मानले जातात.) ही घटना जरी इ. स. १९१९ ची असली तरी इ.स. १९६४ पासून हा राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जात आहे.

खरे पाहता, आम्हा भारतीयांचे हे भाग्यच आहे की, आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभलेला आहे. देशाच्या पूर्व-पश्चिम किनारपट्टीची लांबी ७, ५१६ कि. मी. आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, प्रत्येक स्वतंत्र आणि सार्वभौम देशाचा, त्याच्या किनाऱ्यापासून पुढे २०० सागरी मैल इतक्या अंतरापर्यंतचा, समुद्रातला आणि हवेतला प्रदेश हा रीतसर त्या देशाच्या मालकीचा असतो. त्या अनुषंगाने भारताची एकंदर किनारपट्टी २२ ५ हजार, १४३ चौ. कि.मी. आहे. म्हणजेच भारत हा एक ‘दर्यावर्दी’ देश आहे. तरीही आज भारताच्या जनमानसात दुर्लक्षित विषय जर कोणता असेल तर तो नौकानयन आज अत्याधुनिक जगात व्यापारी मालवाहतुकीसाठी रेल्वे, रस्ते आणि विमानसेवा उपलब्ध आहे. त्या मार्गांनी मालवाहतूक होतेदेखील पण सर्वात स्वस्त वाहतूक म्हणजे नौकानयनाच्या माध्यमातूनच होत आहे.

देशातील आयात-निर्यात ही अखंड सुरू राहणारी प्रक्रिया आहे. वेळोवेळी याचे महत्व यापूर्वी निदर्शनास आले होते. याच नौकानयनाच्या माध्यमातून इ.स. १९६०-७० या दशकामध्ये भारताला गहू आणि इतर धान्याची आयात करावी लागली होती. त्यावेळी याच व्यापारी जहाजांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. एवढेच काय अन्नधान्य थेट पोहचवले गेल्याने याला ‘शिप टू माऊथ’ असेही संबोधण्यात आले होते. एकंदरीत या सागरी माध्यमातून मोठ्या प्रमाणात अन्नधान्यासह इतर साहित्य आणि अर्थकारणाला बळकटी देणाऱ्या वस्तूंची आयात-निर्यात केला जाणारा हा दिवस माहिती असणे गरजेचे आहे. असून याचे महत्त्व जागतिक सागरी क्षेत्रात आपल्या देशाने अग्रगण्य स्थान मिळवण्यासाठी, मेरीटाईम इंडिया व्हिजन २०३० मध्ये १० प्रमुख बाबी रेखांकित करण्यात आल्या आहेत. जहाज बांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापरात आपला जागतिक वाटा वाढविणे, सर्व भागधारकांना समर्थन देण्यासाठी धोरण आणि संस्थात्मक फ्रेमवर्क मजबूत करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाद्वारे लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढविणे, ड्राइव्ह लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि मूल्यावर आधारित स्पर्धात्मकता वाढविणे, सर्वोत्तम श्रेणीतील बंदरात पायाभूत सुविधा विकसित करणे, सुरक्षित व शाश्वत आणि हरित सागरी क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणे, जागतिक दर्जाचे शिक्षण व संशोधन आणि प्रशिक्षण घेऊन अव्वल सीफेअरिंग नेशन होणे, भारताचा जागतिक दर्जा आणि सागरी सहकार्य वाढवणे, महासागरासह किनारी आणि नदी क्रूझ क्षेत्राला प्रोत्साहन देणे, आंतर्देशीय जलमार्गाद्वारे मालवाहू आणि प्रवाशाची वाहतूक वाढवणे,

आपल्याला ही माहिती असणे आवश्यक आहे.

भारतात १२ मोठी बंदरे आहेत. भारतात २०० पेक्षा जास्त बिगर व्यापारी प्रमुख बंदरे । आहेत. भारताचे सागरी क्षेत्र भारताच्या व्यापार मूल्याच्या ६५% आहे. भारताचा ९५% व्यापार सागरी क्षेत्रातून होतो. भारतातील बंदरांवर हाताळल्या जाणाऱ्या एकूण कार्गोपैकी ५४% माल १२ प्रमुख बंदरांद्वारे हाताळला जातो. टॉप ४० जागतिक कंटेनर बंदराच्या यादीत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ३३ व्या स्थानावर आहे आणि मुद्रा (गुजरात) ३७ व्या स्थानावर आहे. जहाजाची ताकद हे जहाज चालवण्याच्या कौशल्यावर खूप अवलंबून असते. सागरी दिनानिमित्त आपण सागरी कर्मचाऱ्यांना सलाम करूया, या उद्योगात आणि सागरी नौकानयन क्षेत्रात काम करणान्या व जगाला जोडणाऱ्या सर्वासाठी हा आनंददायी सागरी दिन बनवण्यासाठी आपण एकत्र येऊ या.