मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती…!

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानींना नववं स्थान मिळालं आहे. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गौतम अदाणी जागतिक यादीत २४ व्या स्थानावर घसरले आहेत. २४ जानेवारी रोजी अदाणी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी त्यांची संपत्ती १२६ अब्ज डॉलर होती. मात्र, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्यांच्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाली.