केरळ मधील कोझिकोडी ट्रेन जळीत प्रकरणातील मुख्य आरोपीला रत्नागिरीतून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या गेल्या. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली आहे.

लवकरच संबंधित तपस यंत्रणा आरोपीचा ताबा (Custidy) घेणार आहेत . दरम्यान केरळ पोलीस देखील रत्नागिरीत दाखल झाले आहेत. संशयित आरोपीचे नाव शाहरुख सैफ असे आहे. अतिशय नाट्यमयरित्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर ही अटकेची कारवाई करण्यात आली.





