सावंतवाडी : सावंतवाडी श्री पंचम खेमराज महाविद्यालय नजिक असलेल्या गाळेधारकांना महावितरण विभागामार्फत वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आलेले होते. यां आदेशाविरुद्ध गाळेधारकांनी अँड.अनिल निरवडेकर यांच्या मार्फत न्यायालयात दाद मागितली होती. त्या संबंधित सावंवाडी न्यायालयाने महावितरण विभागाच्या आदेशावर अंतरिम मनाई आदेश पारित करून सदर प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत कोणत्याही गाळेधारकाचे वीज कनेक्शन तोडून वीज पुरवठा खंडित करू नये असा आदेश दिला. सावंतवाडी न्यायालया मार्फत गाळेधारकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल सर्व गाळेधारकांनी अँड.अनिल निरवडेकर यांचे अभिनंदन करून आभार मानले.





