वेंगुर्ले : आडेली खुटवळवाडी येथे सोमवारी सामाईक घराच्या पडवीचे बांधकामावरून जावा-जावांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसान शिवीगाळ व मारहाणीत झाले. या प्रकरणी नलिनी सुकळवाडकर यांना झालेल्या दुखापतीसंदर्भात डॉक्टरांचा रिपोर्ट आल्यानंतर महादेव गुरुनाथ सुकळवाडकर, गीतांजली गुरुनाथ सुकळवाडकर व भक्ती महोदव सुकळवाडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार, ही घटना सोमवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या -सुमारास घडली. सामाईक घराची मागची पडवी • बांधण्याचे सर्वांनी ठरविले होते. त्यानुसार मागविण्यात आलेले चिरे, वाळू गीतांजली यांनी बाजूला ठेवले. आपण सर्वांनी घराची पडवी बांधण्याचे ठरविले असताना तुम्ही ते सामान बाजूला का ठेवता, असे गीतांजली यांना नलिनी ज्ञानदेव सुकळवाडकर यांनी विचारणा केल्यावरून ‘भांडण झाले. त्यावेळी नलिनी यांना गीतांजली यांनी “शिवीगाळ केली. त्या रागाने महोदव या मुलाने नलिनी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. या मारहाणीत नलिनी यांच्या हाताची दोन बोटे फ्रेंक्चर झाली. या तक्रारीच्या अनुषंगाने वैद्यकिय अहवाल आल्यानंतर ४ एप्रिल रोजी महोदव गुरुनाथ सुकळवाडकर, गीतांजली गुरुनाथ सुकळवाडकर व भक्ती महोदव सुकळवाडकर -यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.





