रामनवमी उत्सवाचे पानवळ येथील श्रीराम मंदिरात आयोजन …

67

बांदा: श्रीराम पंचायतन मंदिर,पानवळ डेगवे -बांदा येथे दि .३० मार्च या दिवशी ” श्री रामनवमी उत्सव” साजरा करण्यात येणार असून यादिवशी सकाळी ९.०० वाजता नित्यपूजन आणि अभिषेक १०.०० वा  ह.भ.प सदाशिव पाटील यांचे कीर्तन, दुपारी १२.०० वाजता रामजन्म सोहळा तर महाप्रसाद ,दु. २:०० ते दु . ३ .०० वाजता भक्ती संगीत प्रदीप चिटणीस (मुंबई ) दु. ३:३० ते सायंकाळी ५:०० पर्यंत प . पू . भक्तराज महाराज भजन मंडळ पर्वरी यांचे भजन,सायंकाळी ५ .०० ते ५ :३० वाजता श्रीरामरक्षा आवर्तन  श्रीराम जप (सामुहिक ) ६. ०० वा. शेखर पणशीकर यांचा “गीतरामायण” कार्यक्रम होणार असून रात्रौ ८ वाजता स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने भजन होणार आहे.समस्त भक्तांनी या कार्यक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन प.पू .दास (रघुवीर ) महाराज यांनी केले आहे.