शरद पवारांच्या गाडीत देवेंद्र फडणवीस | अशा रंगल्या चर्चा..?

पुणे : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस रविवारी ( ८ जानेवारी ) पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यामुळे एकत्र प्रवास करताना त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच ही नव्या राजकारणाची नांदी तर नाही ना..? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.