कुडाळ : भविष्यात कोणत्याही क्षेत्रात वाटचाल करताना आपल्या समाजाचा अभिमान बाळगा व मोठे व्हा असे प्रतिपादन भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण यांनी पणदूर येथील मेळाव्यात केले तसेच आपला समाज मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे एप्रिलमध्ये होणारा महामेळावा हा एका छत्राखाली संघटनेचा नाही तर आपल्या संपुर्ण समाजाचा असेल असे जाहीर केले.
भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेचा संत रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य सत्कार सोहळा जिल्हाध्यक्ष भारत पेंडुरकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण उद्योजक बाबल पावसकर यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सदगुरु कृपा मंगल कार्यालय पणदूरतिठा येथे आज पार पडला.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी उद्योजक नामदेव चव्हाण, अरुण होडावडेकर, अनिल चव्हाण, मालिनी चव्हाण, मानसी चव्हाण, यशवंत देवरुखकर, प्राजक्त चव्हाण, मानसी चव्हाण, डॉ. प्रतिक्षा चव्हाण. गणेश चव्हाण. मंगेश चव्हाण पंढरी पाताडे, गणपत चव्हाण, सहदेव चव्हाण, रमेश कुडाळकर, अंकुश चव्हाण, चारुलता चव्हाण, दत्ताराम म्हापणकर, सुरेश जाधव, चंद्रकांत चव्हाण, भूषण पाताडे, मनोहर वालावलकर, बबन देवरुखकर, सुदेश किनावडेकर, यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी, युवक, तालुका कार्यकारिणी, विषय समिती पदाधिकारी, सदस्य व हितचिंतक आदी उपस्थित होते.
पंढरी चव्हाण म्हणाले, आपला समाज फार मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे समाजाच्या संघटना अनेक आहेत या सर्व संघटना एका छत्राखाली आल्या पाहिजेत यासाठी कार्यरत राहणार आपल्या समाजाचा एकत्रित महामेळावा एप्रिलमध्ये घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर केले आरोग्य क्षेत्रात कोणताही आजार असेल यासाठी आम्ही प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्याशिवाय त्यांचे पीए अरुण सावंत हे कोकणातील असल्यामुळे आपल्याला त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्याही बाबीची कमतरता भासणार नाही तसेच समाजाचे राज्य उपाध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांचा राज्यातील काही मंत्री तसेच आमदार यांच्याशी अतिशय जवळचे संबंध असल्यामुळे ज्या समाज बांधवांना अडचणी असतील त्यांनी प्राजक्त चव्हाण यांच्या माध्यमातून काम करून घ्यावे असे सांगत ज्या समाजामुळे आपण मोठे झालो त्याचा अभिमान बाळगून पुढे गेले पाहिजे समाजाच्या प्रवाहात नेहमी राहा मोठे व्हा असे सांगितले. जिल्हाध्यक्ष भारत पेंडूरकर यांनी मी चर्मकार समाजाच्या माध्यमातून ज्या क्षेत्रात कार्यरत आहे यश संपादन करत आहे त्यामध्ये समाजाचे फार मोठे योगदान आहे विशेष म्हणजे आपले राज्य अध्यक्ष पंढरी चव्हाण व माजी जिल्हाध्यक्ष व जेष्ठ जिल्हा मार्गदर्शक बाबल नांदोस्कर यांचे तळागाळात संघटना बांधणीसाठी फार मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले तळागाळात आपली संघटना फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे आपल्या समाजातील तरुण बेरोजगाराना नोकरीच्या माध्यमातून रोजागारीची संधी मिळावी यासाठी आमचा प्रयत्न राहील तसेच समाजाची संगीत अकॅडमी सुरू करण्याच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अलीकडेच भेट घेण्यात आली असून बरीच वर्ष प्रलंबित असलेला समाजभवनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले यावेळी अनिल चव्हाण अरुण होडावडेकर गुरुदास पेंटर कावेरी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी समाजाचे नूतन म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण पांग्रड सरपंच कावेरी चव्हाण हिलॉक सदस्य देवयानी कदम, रोहिणी चव्हाण, उपसरपंच सौ. खोटलेकर, सदस्य गुरुदास पेंटर सदस्य रिया नाईक यांचा सत्कार करण्यात आला बचतगट महिला स्नेहा दळवी रोहिणी चव्हाण तसेच जिल्ह्यातील विविध महिला बचत गट यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला विशेष सन्मानाने गणपत चव्हाण सहदेव चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले स्वागतगीत मीनाक्षी चव्हाण यांनी सादर केले सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी केले कु केतन चव्हाण याने छत्रपती शिवाजी महाराज,व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पोवाडा सादर केला. कार्यक्रमाची सांगता उर्मी चव्हाण या चिमुकलीने लावणी सादर करून केली.





