रिफायनरीवरून प्रमोद जठारांनी विरोधकांना पुन्हा सुनावलं…!

कणकवली : कोकणात प्रकल्प येऊ घातला की ताबडतोब त्याला विविध स्तरावरून विरोध सुरू होतो. कधी तो राजकीय असतो तर कधी तो सामाजिक असतो. कोकणात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरून कोकणामध्ये राजकारण तापलेले आहे. भाजपचे माजी आमदार तथा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी याला विरोध करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांना चांगलंच सुनावले आहे.

गेले अनेक वर्षापासून रिफायनरी प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे अडकून पडलेला आहे या प्रस्तावित प्रकल्पामध्ये काही भूमिपुत्राने समर्थन दर्शवला असला तरी काही जणांनी या प्रकल्पाला विरोध देखील मोठ्या प्रमाणात केला आहे.
भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी विनायक राऊत यांच्या वर हल्लाबोल केलाय विनायक राऊत यांना राज ठाकरेंवर बोलण्याचा अधिकार नाही. तीन लाख कोटींचा कोकणात येणारा प्रकल्प तुम्ही गेली पाच ते सात वर्ष अडवून ठेवला. दोन लाख तरुणांना रोजगार मिळाला असता आधी या पापाचे धने व्हा. आणि मग राज ठाकरेंना जाब विचारा असा प्रमोद जठार यांनी ठणकावले. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या विधानावरून भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार हे चांगलेच आक्रमक झाले आहेत.