दोडामार्ग : पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालय पिकुळे येथे मंगळवार दि. १० व बुधवार दि. ११ जानेवारी रोजी ५० वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तंत्रज्ञान आणि खेळणी हा या प्रदर्शनाचा विषय आहे. मंगळवारी सकाळी १० वा. नोंदणी ११ वाजता उद्घाटन उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, प्रमुख अतिथी माजी मुख्याध्यापक अन्वर खान, तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी महेश ध़ोत्रे, प्रदिप कुडाळकर, तहसीलदार अरुण खानोलकर, धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष मिलिंद तोरसकर, सहसचिव नंदकुमार नाईक, सावळाराम गवस हे उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२.३० वा.निबंधस्पर्धा होणार आहे. बुधवार सकाळी १०वा.विज्ञान प्रतिकृतीचे परीक्षण व प्रश्नमंजुषा, दु.३वा. पारितोषिक वितरण व समारोप कार्यक्रम होणार आहे.कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन मुख्याध्यापिका स्नेहल गवस यांनी केले आहे.





