कुडाळ : पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील भूपकर वाडी येथील अजय वाढवे यांचे घर फोडल्याप्रकरणी दोन परप्रांतीय इसमाना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांना कुडाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. चंदन मेस्ञी, धीरज यादव अशी या संशयित चोरांची नावे आहेत.
वाढवे यांचे घर फोडल्याप्रकरणी या दोघांना पकडून मनसे माजी उपतालुका अध्यक्ष दीपक गावडे यांनी कुडाळ पोलीस स्थानकात आणले. यावेळी त्यांच्या सोबत राजन माणगावकर, रोशन कटेकर, गणेश जाधव, अजय वाढवे, केतन चव्हाण हे उपस्थित होते.





