नाबर प्रशालेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिकवला जाणारा अभ्यासक्रम कौतुकास्पद : अच्युत सावंत भोसले

बांदा : नाबर प्रशालेत नुकताच सुरू झालेला सीबीएसई, आईसिएसई व स्टेट बोर्ड चा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम हा नवीन तंत्रज्ञानावर आधारित आहे ,तसेच दृकश्राव्य ,प्रात्यक्षिक पद्धतींचा,तंत्रज्ञानाचा वापर करून शिकवला जाणारा हा अभ्यासक्रम आहे आणि या अत्याधुनिक अभ्यासक्रमाचे धडे मुले या शाळेत घेत आहेत, हे त्यांचे सद्भाग्यच आहे.तसेंच इयत्ता सहावी पासून मुले व्यावसायिक शिक्षण घेत अहेत ही कौतुकास्पद गोषट आहे.ही मुले नक्कीच पुढे यशाची उच्च शिखरे गाठतील ,यात शंकाच नाही.” असे विचार भोसले एज्युकेशन सोसायटी,सावंतवाडीचे संस्थापक तसेच अध्यक्ष श्री अच्युत सावंत भोसले यांनी नाबर प्रशालेच्या स्नेहसंमेलनात व्यक्त केले.

शनिवार नुकतेच नाबर प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी,सावंतवाडीचे अध्यक्ष तथा संस्थापक श्री अच्युत भोसले ,माजी उपनगराध्यक्षा सावंतवाडी च्या अन्नपूर्णा कोरगावकर ,श्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री मंगेश कामत, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर ,माजी पंचायत समिती सदस्य शितल राऊळ, माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब ,बांदा ग्रामपंचायत सदस्य रेश्मा सावंत, साई काणेकर, आबा धारगळकर ,रिया येडवे ,दीप लक्ष्मी पटेकर ,तसेच अन्वर खान ,गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य मनोज कामत, भिकाजी धुरी, उद्योजक शशी पित्रे ,भाऊ वळंजू ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी डॉ होमी भाभा परीक्षेत व सायन्स ओलिम्पियड परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या नाबर प्रशालेच्या कुमारी मधुरा जगदीश पाटील, तसेच पि.एच.डी. पदवी प्राप्त केलेल्या श्रीमती भक्ती महाजन यांचा गुलाबपुष्प, शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी उपमुख्याध्यापिक शिल्पा कोरगावकर यांनी प्रशालेतील विविध उपक्रमांचे स्लाईड शोच्या माध्यमातून सादरीकरण केले, गेले , विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर, ऐतिहासिक, महिला सबलीकरण ,सामाजिक समस्या व जनजागृती पर अप्रतिम नृत्ये,विनोदी नाटके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. दहावीच्या विद्यार्थ्यांचा विविधतेतून एकता दर्शवणारा फॅशन शो ,तसेच सातवीच्या विद्यार्थ्यांची वारकऱ्यांची दिंडी हे कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणावर खुश होऊन बक्षिसांची लयलूट केली आणि त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले .
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिशा रॉड्रिग्ज मॅडम आणि सांस्कृतिक कमिटी सदस्य व शिक्षक यांनी विशेष मेहनत घेतली. एम.एस.एफ.सी विभाकडून लोकोपयोगी सेवा या अंतर्गत म्हणून खाद्यपदार्थ विक्री स्टाँल लावण्यात आला होता.यासाठी समन्वय राकेश परब,निदेशिका सौ.रिया देसाई, सौ.गायत्री देसाई, श्रीमती सेजल सावंत,सुरेखा परब,महाले,यांनी मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेलन रॉड्रिग्ज यांनी केले ,पाहुण्यांचा परिचय रसिका वाटवे ,प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई तर आभार प्रदर्शन अनिशा रॉड्रिग्ज यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका रीना मोरजकर ,स्नेहा नाईक व अनिशा रॉड्रिक्स यांनी केले.