चेतन चव्हाण यांनी जाणून घेतल्या ग्रामीण रुग्णालयातील समस्या

दोडामार्ग : दोडामार्ग रुग्णालयात आलेल्या रुग्णांना बऱ्याच अडचणीना सामोरे जावे लागत आहे,रुग्णांची धावपळ, त्यांना होणार नाहक त्रास लक्षात घेता कसई दोडामार्ग नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी आज रुग्णालयात डॉ.ऐवळे यांची भेट घेत रुग्णालयातील समस्या जाणून घेतल्या.

रुग्णालयात कायमस्वरूपी फार्मासिस्ट, रुग्णवाहिकेवर कायमस्वरूपी चालक,अपुरा कर्मचारी वर्ग या सर्व समस्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांच्या निदर्शनास आणुन देत आगामी काही दिवसात ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील,तसेच पालकमंत्री यांच्या माध्यमातुन रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहत दुरुस्तीसाठी ९० लाख रुपये मंजुर करण्यात येतील असेही चेतन चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले यावेळी उपनगराध्यक्ष देविदास गवस, रंगनाथ गवस,प्रविण गवस,रामचंद्र मणेरकर,सुधीर पनवेलकर,नितिन मणेरकर,सुनिल गवस,समिर रेडकर,राजेश फुलारी,विशाल मणेरीकर,मनोज पार्सेकर,विशाल चव्हाण,स्वप्निल गवस,प्रकाश सावंत,शशांक नाईक आदी उपस्थित होते.