दोडामार्ग : मोर्ले येथील माजी सैनिक कॅप्टन आपा विठू गवस (८२) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. मराठा लाईफ इनफन्ट्री मध्ये त्यांनी देशसेवा केली, तर चीन व पाकिस्तानच्या युद्धामध्ये सुद्धा त्याचा सहभाग होता. मुद्रांक विक्रेते आनंद गवस यांचे वडील तर प्राथमिक शिक्षक दीपक दळवी यांचे सासरे होत,त्यांच्या पश्चात मुलगा,सून, विवाहित मुली,नातवंडे असा परिवार आहे.





