आता आम्ही करायचे काय ? | कणकवलीतील स्टॉल हटावानंतर स्टॉलधारकांच्या संतप्त प्रतिक्रिया

58

कणकवली | मयुर ठाकूर : शहरातील ओव्हर ब्रिज खालील अतिक्रमण हटाव मोहिमेकरिता आज पोलीस बंदोबस्तात महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाल्यानंतर कणकवली नरडवे नाक्यावरून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. जे विक्रेते स्वतःहून स्टॉल हटवण्याची ग्वाही देत आहेत ते वगळून अन्य स्टॉल व विक्रेत्यांची दुकाने हटविण्यात ची कार्यवाही हाती घेण्यात आली.

मात्र या दरम्यान या ब्रिज खाली बसणाऱ्या सर्व भाजी, फळ, फुले व अन्य स्टॉल धारकांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली मधील ओम गणेश निवासस्थानी धाव घेतली आहे. दोन वर्षाच्या कोविड काळा नंतर आता व्यापार उद्योग सुरू केला. मात्र सांगा आता आम्ही काय करायचे? असा सवाल करत या विक्रेत्यांनी नारायण राणे यांच्याकडून कारवाईला शिथिलता देण्याबाबत आदेश देण्याची अपेक्षा ठेवली. तर आता या अनधिकृत स्टॉल हटाव कारवाई संदर्भात राणे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

असे असताना त्या ठिकाणच्या लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटतात आम्ही आमचं घर याच धंद्यावर चालवत होतो मात्र आता आम्हाला आश्वासन देऊन या ठिकाणी आता आमच्यावर ही कारवाई करण्याची वेळ आणलेली आहे. थोडक्यात दुरून डोंगर साजरे अशा प्रकारची ही कारवाई असल्याच्या प्रतिक्रिया काही स्टॉल धारकांमधून उमटत आहेत. मात्र उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नगराध्यक्ष, सीईओ यांची या बाबत तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण अशी बैठक आयोजित्य केले आहे. या बैठकीदरम्यान नेमका स्टॉल धारकांबाबत काय निर्णय होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.