सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील महिलांची प्रतिष्ठा वाढविणारा व महिलांना रोजगारात पुढे आणण्याच्या दृष्टीने आमदार तथा जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक नितेश राणे यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने जाहीर केलेल्या अबोली ऑटो रिक्षा योजनेचा शुभारंभ शनिवार दिनांक १८मार्च २०२३रोजी दुपारी ३ वाजता सौ नीलम ताई राणे यांच्या हस्ते तर बँकेचे संचालक आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील अनेक रोजगार घटकांसाठी मदतीचा हात दिला असून जिल्ह्यातील पशुपालकांसाठी वरदान ठरणारी दुधाळ जनावरे योजना एक चळवळ म्हणून राबविले आहे. भाजपा नेते नामदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यानी दुग्ध उत्पादनात काम करणाऱ्या शेतकरी पशुपालकांसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. यासाठी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भगीरथ प्रतिष्ठान गोकुळ दूध प्रतिष्ठान यांचीही मदत घेतली आहे. दुग्ध क्रांतीच्या या चळवळीत पाठोपाठ महिलांना अन्य व्यवसायात वाव देणारी अबोली ऑटो रिक्षा योजना आणली जात आहे. पर्यटन सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांच्या हाती आलेल्या या पिंक ऑटो रिक्षा आकर्षण ठरतील व महिलांसाठी रोजगाराचे हे नवीन दालन सुरू होईल अशी अपेक्षाही मनीष दळवी यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासा मध्ये आणि प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी सिंधुदर्ग जिल्हा बँकेचे बँकेची माता-भगिनींना प्रोत्साहन देणारी अबोली ऑटो रिक्षा हि महत्त्वकांशी योजना जिल्हा बँकेने हाती घेतली आहे.या योजनेचा शुभारंभ सिंधुनगरी येथील बँकेच्या प्रधान कार्यालयातील शिवछत्रपती सभागृहात शुभारंभाचा iooहोत असून, अबोली ऑटो रिक्षा योजनेत प्रथम तीन आलेल्या प्रस्तावना जिल्हा बँकेने मंजुरी देत यातील पहिल्या तीन लाभार्थींना या ऑटो रिक्षाचे वितरण होणार आहे. या योजनेच्या द्वारे महिला जिल्ह्यात पिंक ऑटो रिक्षा चालवताना दिसणार आहेत व त्यासाठी पुढाकार घेणाऱ्या महिलांना सवलतीच्या व्याजदरात जिल्हा बँक अर्थसहाय्य करणार असून प्रशिक्षणासह, बॅच रिशा परमिटचा खर्च आमदार नितेश राणे स्वतः करणार आहेत.
जिल्हा बँकेने या योजनेसाठी ९% सवलतीच्या जाहीर केला असून किमतीच्या८५% कर्ज पुरवठा जिल्हा बँक करणार आहे उर्वरित १५ टक्के कर्ज पुरवठा हा पहिल्या येणाऱ्या पाच महिलांसाठी स्वतः आमदार नितेश राणे करणार आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील बॅच,रिशा परमिट यासाठी लागणारा खर्च पहिल्या पाच महिलांसाठी आमदार नितेश राणे हे करणार आहेत. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येत महिलांची संख्या साडेपाच लाख आहे. ही संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे लोकसंख्येने जास्त असलेल्या महिला जिल्ह्याच्या उद्योग व्यवसायात अर्थकारणात पुरुषांच्या तुलनेने दिसत नाहीत. महिलांचा हा सहभाग वाढावा त्यांनी आत्मविश्वाने पुढे यावे यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. तोच उद्देश ठेवून जिल्हा बँकेने ही अबोली ऑटो रिक्षा योजना अंमलात आणण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यातून जिल्ह्यातील महिलांची हिम्मत वाढावी,त्या कष्टाने पुढे याव्यात हाच बँकेचा प्रमुख उद्देश आहे. जिल्ह्यात विमानतळ, मोठ मोठे हॉटेल सुरू होत आहेत विविध प्रकल्प येऊ घातले आहेत विकासाच्या या पर्यायाला महिलांची साथ लाभावी व त्यानी हा विकास साधला जात असताना महिलांना रोजगार मिळावा त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी ही योजना पुढे आणली जात आहे असेही मनीष दळवी म्हणाले.





