मुंबई : ज्येष्ठ शिवसेना नेते सुभाष देसाई (उद्धव ठाकरे शिवसेना) सुपुत्र भूषण देसाई यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. पत्रकार परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमच्या बंडाच्या सुरुवातीपासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणारे अनेक कट्टर नेते आमच्यासोबत आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आम्ही काम करत आहोत आणि सामान्य माणसाच्या हितासाठी काम करत आहोत, असे ते म्हणाले. हे लक्षात घेऊन भूषण देसाई यांनी आमच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या पक्षात प्रवेश केला.
यावेळी भूषण देसाई म्हणाले, बाळासाहेब ठाकरे हे माझे आराध्य दैवत असून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेला हिंदुत्वाचा वारसा पुढे नेत आहेत. एकनाथ शिंदे यांचे काम मी जवळून पाहिले आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे भूषण म्हणाले.





