वेंगुर्ला : सरकार योजना आणते परंतु आमच्या पर्यंत पोहचत नाही. लहान मच्छीमार यांना शासकीय योजनेचा फायदा नाही याचा फायदा फक्त मोठ्या मच्छीमारांवर होतो . सरकारला आमची जाग कधी येणार इलेक्शन आल्यावर सरकारला आमची जाग येते. अशी टीका मच्छीमार बांधवानी केली आहे.
मासेमार कुटुंबाच्या कल्याणासाठी ५० कोटींचा मस्तविकास कोश विमा आणि डिझेल अनुदाचा दिलासा दिल्याबद्दल शिंदे आणि फडणवीस सरकारच आम्ही अभिनंदन करतो. डिझेल अनुदानासाठी यांत्रिक नौकेच्या १२० अश्र्वशक्तीची अट काढली त्यामुळे ८५ हजार अधिकच्या मासेमारांना लाभ होणार पारंपरिक मासेमारी करणाऱ्या मासेमार बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने ५लाखांचा विमा देणार. परंतु. जे मच्छीमार कार्यसदन आहेत अश्याच मच्छीमारांना याचा फायदा होतो. जो खरा मच्छीमार आहे, जो समुद्राच्या लाठांशी जीव धोक्यात घालून खेळत आहे त्याला या अर्थ संकल्पाचा काहीही फायदा नाही. सरकारला मच्छीमारांनाची जाणिव नाही . मच्छीमरांनाकडे सरकार गांभीर्याने दुर्लक्ष करत आहेत . इलेक्शन आले की गाजर देऊन मते मागायची आणि सरकार चालवायचे अशी टीका मच्छीमार बांधवांनी सरकारवर केली आहे.




