मद्यधुंद अवस्थेत बेफाम डंपर वाहतूक…!

186

सावंतवाडी : मळेवाड – सावंतवाडी मार्गावर खनिज वाहतूक करणारा डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत जीवाचीपर्वा न करता बेफाम वेगाने  खनिज डंपर चालवत असतानांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे ही डंपर वाहतूक पुन्हा एकदा सर्व सामन्यांच्या जीवावर बेतणारी आहे.

या व्हीडिओ वरून अस समजतंय की डंपर वाहतूक करणाऱ्या चालकाला शुद्ध नसावी. मागील महिन्यापासूनच खनिज वाहतूक सुरू झाली व या मार्गावरील डंपर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यात काही डंपर चालक स्वतःच्या व दुसऱ्या जीवाची पर्वा न करता वाहतूक सुसाट करत असल्याचे आढळून येत आहे. त्यात डंपर मागील होवदयाला पूर्ण कव्हर नसणे व त्यातून माती बाहेर पडणे, वाहतूक वेळ ठरवण्यात आली आहे. हे सर्व नियम धाब्यावर बसवून उशिरा पर्यंत वाहतूक करणे असे अनेक प्रकार दिसून येत आहेत.

एकंदरीत खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना घालण्यात आलेले नियम धाब्यावर बसवत वाहतूक सुरू असल्याचे दिसून येत आहे. व्हायरल झालेला प्रकार हा अतिशय गंभीर असून जीवनाशी खेळ खेळण्या सारखा आहे. या विडिओ मध्ये डंपर चालकाने ज्या ठिकाणी गाडी दगडावर चढवली ती जागा एका राहत्या घराचा कठडा आहे तर त्या ठिकाणावरून फक्त 300 मीटर वर प्राथमिक शाळा आहे.

डंपरच्या पाठीमागून येत असलेल्या न्हावेली येथील विशाल धवन, वैभव चौकेकर व काही ग्रामस्थांना याचा अंदाज आल्याने त्या डंपर चा पाठलाग करत त्याला थांबवायची विनंती केली तरी देखील त्या वाहन चालकाने गाडी न थांबवता सुसाट वेगाने निघू लागला. या वाहनाचा पाठलाग करत जवळपास 7 किलोमीटर अंतरावर वाहन थांबवण्यास ग्रामस्थांना यश आले.

या प्रकारामुळे ग्रामस्थ चांगलेच भडकले होते त्यावर त्या गाडीच्या मालकाला व खनिज कंपनीच्या जबाबदार व्यक्तीला बोलवण्यात आले. मात्र या प्रकाराची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नव्हता. योग्यवेळी या मद्यधुंद चालकाला ग्रामस्थांनी रोखल्याने पुढील अनर्थ टळला. खनिज वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांचा मुजोरा असाच चालत राहिल्यास व झालेल्या प्रकाराबद्दल चर्चा न झाल्यास रस्तारोको करून खनिज वाहतूक रोखून आंदोलन करू असा इशारा न्हावेली सरपंच अंकित धाऊसकर व सदस्य अक्षय पार्सेकर यांनी दिला आहे. या वाहतूक करणाऱ्या चालकांवर व मालकावर पोलीसा कडून व खनिज कंपनीकडून काय कार्यवाही होते हे पाहणे गरजेचे आहे.