बुलढाणा : पति वर दाखल करण्यात आलेली खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सारंगपूर येथील एका महिलेने मेहकर तहसील आवारात असलेल्या टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले .8आंदोलन करणाऱ्या महिलेचे नाव रुक्मिणी बोरकर असे आहे . सदरहू महिलेच्या घरासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीने तिच्याकडे बघून अश्लील हावभाव केले होते. त्याच्या विरुद्ध मेहकर पोलीस स्टेशनमध्ये तीने तक्रार दिली होती. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास बराच विलंब केला.
त्यानंतर तक्रार दाखल करून घेतली. त्यानंतर संबंधित आरोपीच्या पत्नीच्या तक्रारीवरून सदरहू महिलेच्या पतीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला .आपल्या पतीचा कोणताही संबंध नसताना त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेली कारवाई ही खोटी असल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा या मागणीसाठी सदरहू महिलेने जिल्हा प्रशासनाला सुद्धा निवेदन दिले होते.परंतु कोणतीही कारवाई न झाल्याने या महिलेने मेहकर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन केले .दरम्यान मेहकर पोलिसांनी हस्तक्षेप करत सदरहू महिलेला टॉवर वरून खाली उतरले असून तिला व तिच्या पतीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.




