भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिंधू संजिवन संस्था देवगड तर्फे भारतीय संविधानाच्या प्रतींचे वाटप

94

 

देवगड (प्रतिनिधी)

 

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिंधू संजिवन संस्था देवगड तर्फे भारतीय संविधानाच्या प्रतींचे वाटप

 

सिंधू संजिवन संस्था देवगड तर्फे कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मा. युवराज घेवदे यांच्या सहयोगाने कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत कुणकेश्वर, इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते, ग्रामपंचायत कोटकामते, ग्राम संघ कोटकामते, श्री भगवती माध्यमिक विद्यालय, वि.का. स. सोसायटी, केंद्र शाळा कोटकामते यांना भारतीय संविधानाच्या प्रतींचे मोफत वाटप करण्यात आले. समाजातील तरुणाई, विद्यार्थी तसेच ग्रामस्थांमध्ये संविधानाची जागरूकता वाढावी, लोकशाहीतील आपली कर्तव्ये व हक्क समजावेत या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

 

“संविधान हे आपले सर्वोच्च मार्गदर्शक आहे. प्रत्येकाने त्याचा अभ्यास करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे.”कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाची उपयुक्तता व महत्व यावर प्रकाश टाकला. असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, महिला व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. संविधानाच्या प्रती मिळाल्यामुळे सर्वत्र समाधान व उत्साहाचे वातावरण दिसून आले.सिंधू संजिवन संस्था या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा प्रकारच्या उपक्रमांतून लोकशाही मजबूत होण्यास निश्चितच मदत होणार आहे.